“मध्यरात्री कत्तलखान्यावर धाड! ४० हजारांचे गोमांस पोलिसांनी जप्त केलं!”
तालुक्यातील कुरण गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर काल मध्यरात्री पोलिसांनी चकाचक धाड टाकत ४० हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त केले.
“मध्यरात्री कत्तलखान्यावर धाड! ४० हजारांचे गोमांस पोलिसांनी जप्त केलं!”
संगमनेर | मेट्रो न्यूज ब्रेकिंग
तालुक्यातील कुरण गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर काल मध्यरात्री पोलिसांनी चकाचक धाड टाकत ४० हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त केले.
या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
अंधारात सुरू होता ‘कालाबाजार’!
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नादिर शेख यांच्या घराच्या मागील बाजूस गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याचे समजताच
पोलिसांनी सव्वातीन वाजता अचानक छापा टाकला.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधारात पसार!
तीन-चार जण कत्तल करत असल्याचे पोलिसांना दिसले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
तरीही पोलिसांनी घटनास्थळी ४०,००० रुपयांचे गोमांस, १५,००० रुपयांची दुचाकी असा एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

“बेकायदेशीर कत्तल चालणार नाही – पोलिसांची कारवाई ठरली धडाकेबाज!”