बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसन पुन्हा उतरणार रिंगणात !
जागतिक व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये एकेकाळी हेविवेट चॅम्पियन राहिलेला माइक टायसन हा सध्या ५८ वर्षांचा आहे. आरोग्यासंबंधी तो चिंतेत असला तरी पुन्हा एकदा रिंगणात उतरण्यास सज्ज झाला आहे. रविवारी त्याला प्रश्न करण्यात आला की, जॅक पॉलशी लढत का देऊ इच्छितो? यावर टायसन ताडकन म्हणाला, ‘कारण मी त्याला हरवू शकतो. माझ्याशिवाय असा कोण आहे, जो त्याला हरवू शकेल? ही लढत माझ्याशिवाय अन्य कोण खेळू शकतो?’ यावेळी चाहत्यांनी टायसनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. पॉलचे हूटिंग करण्यात आले. टायसन आणि पॉल यांच्यातील ही लढत आधी २० जुलै रोजी व्हायची होती. टायसनला अल्सर असल्याने लढत पुढे ढकलण्यात आली. हा सामना आता १५ नोव्हेंबर रोजी टेक्सासच्या आर्लिंग्टन येथे होईल.