फोटो व्हायरल ची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
घटना : ६ एप्रिल, दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास

अहिल्यानगर | तोफखान्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय मुलीवर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
घटना : ६ एप्रिल, दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास
ठिकाण : शहराजवळील एक हॉटेल व नंतर बीड
आरोपी : गौरव सुनील घाडगे (वय १९, रा. बेलेकर कॉलनी, कर्जत)
गुन्हा दाखल : ३० जून, तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर
पीडित मुलगी बारावी शिकत असताना २०२४ मध्ये आरोपीशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती क्लाससाठी अहिल्यानगरला आली असताना आरोपी तिला भेटण्यासाठी आला. मात्र तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला.
त्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिच्यासोबत फोटो काढले आणि धमकी दिली की, “तू जर बोलली नाहीस तर हे फोटो तुझ्या वडिलांना दाखवीन.”
या धमकीमुळे घाबरलेली पीडिता आरोपीसोबत गेली. त्याने तिला शहराबाहेर एका हॉटेलमध्ये नेलं आणि तिथे बळजबरीने अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, जेव्हा पीडिता नंतर बीडला आपल्या नातेवाइकांकडे गेली, तिथेही आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.
हा प्रकार म्हणजे फक्त गुन्हा नाही, तर एक विकृती आहे – जी समाजाच्या मूलभूत सुरक्षिततेवर घाव घालते!
नव्या पिढीचा स्पष्ट सवाल –
“फोटो, धमकी, आणि विश्वासाचं शस्त्र वापरून गुन्हे करणाऱ्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा कधी दिली जाणार?”
मुलींनी, पालकांनी आणि समाजाने सजग व्हायला हवं!