बनावट नोटा प्रकरणातील मास्टरमाइंड कोण?

अहिल्यानगर जिल्ह्यातील गंभीर प्रकार!

🟥
 बनावट नोटा प्रकरणातील मास्टरमाइंड कोण?
📍 अहिल्यानगर जिल्ह्यातील गंभीर प्रकार!
👮‍♂️ राहुरी पोलिसांकडून तपास सुरू!

बनावट नोटा छपाई प्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, या साऱ्या रॅकेटचा मास्टरमाईंड नेमका कोण? – याचा शोध सध्या राहुरी पोलिसांकडून घेतला जात आहे.

🧾 अटक आरोपींची नावे:
1️⃣ पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय ३३, अर्जुननगर, करमाळा, जि. सोलापूर)
2️⃣ राजेंद्र कोंडिबा चौघुले (वय ४२, पाटेगाव, जि. अहिल्यानगर)
3️⃣ तात्या विश्वनाथ हजारे (वय ४०, पाटेगाव, जि. अहिल्यानगर)

📆 शनिवारी प्रतीक पवार, चौगुले व हजारे यांच्यासह मोटरसायकलवरून राहुरी येथे बनावट नोटा वितरित करण्यासाठी आला असताना, राहुरी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून अटक करण्यात आली.

🏠 प्रतीक पवार याने टेंभुर्णी येथे भाड्याच्या खोलीत सुरू केला होता छोटेखानी छपाईचा कारखाना!
📦 पोलिसांनी या ठिकाणाहून ६४ लाख ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले!


🚨 प्रश्नांचा पाऊस:
❓ बनावट नोटा तयार करण्यासाठी मशीन, कागद, शाई कुठून आणले?
❓ अजून कोणी यात सामील आहे का?
❓ अशा नोटा अजून कुठे कुठे वितरित झाल्या आहेत?
❓ मास्टरमाईंड कोणी?
❓ आणि सर्वात महत्त्वाचं – या नोटा राहुरीतच कशा आल्या?

 

🧭 पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, पुढील तपास सुरू आहे.
📣 पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जात आहे.