*खेळाने व्यायाम होतो व शरीर बळकट होते* – श्री बाळासाहेब हराळ

*गुंडेगाव येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन*

*रविवार दि.७/०३/२०२१ : रोजी गुंडेगाव येथे श्री बाळासाहेब हराळ मित्र मंडळाच्या वतीने भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे, यावेळी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते तसेच आलेल्या स्पर्धकांना. त्यांनी मार्गदर्शन केले. मुलांनी शिक्षणा सोबत खेळात देखील आपलं भवितव्य घडवलं पाहिजे.खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो.खेळ जीवनात खूप आवश्यक आहे.

Also see this and subscribe 

आयुष्यभर एखादा खेळ छंद म्हणून खेळत राहिलात तर नक्कीच एक आरोग्यपूर्ण जीवन तुम्ही जगू शकता. त्यामुळे खेळाचे महत्त्व लहानपणीच कळाले तर मुले खेळात पारंगत तर होतीलच शिवाय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनतील.श्री बाळासाहेब हराळआज कालच्या युगातील मुले ही मैदानी खेळ कमी तर ह्या आधुनिक जगात मोबाईल सारख्या तंत्रज्ञानामुळे भरकटत चालली आहे खेळ कोणताही असो तो जिंकण्यासाठी आपल्या बुदधीचा वापर करतो व मनात एक जीद्द ठेवुन जिज्ञासा वृत्तीने लक्ष केंद्रित करुन तो खेळ एकाग्रतेने खेळुन त्यात हमखास यश हे प्राप्त केले जाते.*

यावेळी गावातील जेष्ठ नागरिक श्री वामनराव जाधव गुरुजी गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय कोतकर उर्फ नाना सुनील भापकर, उद्योजक किरण कोतकर, चंद्रकांत निकम,  दादासाहेब आगळे,  संदीप भापकर, उद्योजक अरुण येठेकर, पुणे पोलिस  बाळासाहेब हराळ, शिंदे युवराज, राजेंद्र मोहिते,मेजर संदिप कोतकर, तसेच क्रिकेट स्पर्धा नियोजन समिती संतोष जरे, गणेश कोतकर,स्वप्निल कपिले,सचिन जरे,भैया हराळ, पवण जरे, यश सतिश चौधरी, ऋषिकेश शिंदे, स्वप्नील भापकर,मोहिते,माने, कासार,भापकर,हराळ,सय्यद,सर्व मित्र परिवार गुंडेगाव यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे. श्री बाळासाहेब हराळभविष्यात  अशा स्पर्धेचे आयोजन केल्यास नक्कीच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व ग्रामीण भागातील खेळाडूंना पुढे येण्यास मदत होईल व व्यासपीठ मिळेल हे नक्की..

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.