शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा! आमदार विक्रम पाचपुते यांनी पोलिस अधीक्षकांकडे घेतली थेट दखल
श्रीगोंदा-अहिल्यानगरचे आमदार विक्रम पाचपुते यांनी ‘सिस्पे इन्फिनाईट, बिकॉन, आय.बी. ग्लोबल, झेस्ट, एएमसी’ अशा कंपन्यांनी जादा परताव्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्राद्वारे कडक कारवाईची मागणी केली आहे.

सुरुवातीला 10% ते 151% पर्यंत परतावा देऊन नागरिकांना आकर्षित केलं, नंतर मात्र पैसे थांबवले गेले.
आता व्हिडिओ-ऑडिओ क्लिपद्वारे नवीन अफवा पसरवत फसवणूक सुरूच!
संचालक फरार – नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष
आमदार पाचपुते यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला असून, शेकडो कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंपन्यांवर फसवणूक व आर्थिक गुन्ह्यांतर्गत तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
“संचालक मंडळाच्या मुसक्या आवळा आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत,” – विक्रम पाचपुते यांचा ठाम आग्रह.
अनेक गुंतवणूकदार अजूनही भ्रमात – या बातमीला शेअर करा आणि सजग व्हा!
जामखेडमध्ये हरकतींचा पाऊस!
ZP आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर जामखेड तालुक्यातून तब्बल ४० हरकती दाखल!
१४ जुलैला जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत होती – आणि जामखेडकरांनी ती फुल्ल वापरली!
जिल्हाभरातून एकूण ८८ तक्रारी, त्यातील जामखेड एकटाच ४० वर!
बाकी तालुक्यांची स्थिती:
- अकोले: ८
- संगमनेर: ६
- कोपरगाव, राहाता, कर्जत: ३
- अहिल्यानगर: ९
- पारनेर: १३
- श्रीगोंदा, राहुरी: १
- श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी: शून्य!
एकाच गटासाठी अनेकांनी हरकती दाखल केल्याने जामखेडमध्ये वादळ उठलंय!
पुढे काय? आता जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या टेबलावर या हरकतींचं नियोजन!