
बाबुशेठ टायरवालेंची गर्जना – अहिल्यानगरकरांमध्ये खळबळ!
जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणतात:
“बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत आहोत…
महापालिका शिवसेनेच्या ताब्यात देऊन
भ्रष्टाचाराचा खेळ संपवणार!”
प्रमुख मुद्दे:
२ वर्षांपासून प्रशासक राजवटीमुळे नागरिकांचे प्रश्न प्रलंबित
रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग… घंटागाडी गायब!
पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे अर्धवट
‘अमृत’ योजना फेल!
महापालिकेच्या शाळा बंद, विद्यार्थी अडचणीत
नगररचना विभागात गोंधळ, भ्रष्टाचार सुरुच!
जल जीवन मिशनवरही गंभीर आरोप!
“कोट्यवधींचा निधी मिळूनसुद्धा पाणी कुठेच नाही…
ठेकेदार-प्रशासन हातमिळवणी करून खाती भरत आहेत!” — टायरवाले
“हे थांबवायचं असेल, तर आता शिवसेना निवडून द्या!”
सवाल एकच: ‘भ्रष्टाचारमुक्त महापालिका’ हवी का?
शिवसेनेच्या बाजूने उभे रहा – असं आवाहन बाबुशेठ टायरवालेंचं!