आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या जुना टिळक रोड ते नविन टिळक रोड रस्त्याच्या कामाची राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडून पहाणी
शहराची खड्डेमुक्तीकडे वाटचाल
जिल्हा नियोजन समितीमधून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या जुना टिळक रोड ते नविन टिळक रोडला जोडणार्या अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाची पहाणी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे यांनी केली. यावेळी नंदूशेठ एकाडे, गोरख पडोळे, सचिन दळवी, विनोद खैरे, ओमकार घोलप, मळू गाडळकर, सोनू घेंबूड, अक्षय डाके, अनिकेत चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शहरातील अनेक रस्त्यांचे काम आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागले आहेत. अनेक रस्त्यांची कामे मंजूर असून, या रस्त्याच्या कामांना गती देऊन ते पुर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डयांमुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. अनेक रस्त्याचे काम मंजूर झाल्याने शहराची खड्डेमुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अभिजीत खोसे यांनी जुना टिळक रोड ते नविन टिळक रोड रस्ता आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झाला असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.रस्त्याचा दर्जा चांगला राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी कामाची पहाणी केली आहे. अनेक रस्त्यांचे कामे हाती घेण्यात आले असून, ते पुर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीमधून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या जुना टिळक रोड ते नविन टिळक रोडला जोडणार्या अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाची पहाणी करताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे समवेत नंदूशेठ एकाडे, गोरख पडोळे, सचिन दळवी, विनोद खैरे, ओमकार घोलप, मळू गाडळकर, सोनू घेंबूड, अक्षय डाके, अनिकेत चव्हाण आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)