आरपीआयच्या युवक जिल्हाध्यक्षपदी अमित काळे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाची जिल्हा कार्यकारणी बैठक आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये आरपीआयचे भिंगार शहराध्यक्ष अमित काळे यांची युवक जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
आरपीआयच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत गाव तेथे आरपीआयची शाखा सुरु करणे, पक्षाची सभासद नोंदणी, पक्ष वाढविण्यासाठी पदाधिकारी व कर्यकर्त्यांना जबाबदारी सोपविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, संजय कांबळे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, पारनेर तालुकाध्यक्ष राजु उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू जगताप, आयटीसेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, महादेव भिंगारदिवे, प्रविण वाघमारे आदी उपस्थित होते.
आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने राज्य उपाध्यक्ष आणि जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या सुचनेनूसार काळे यांची युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली. उपस्थित पदाधिकार्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करुन काळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी दिवंगत युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे व आंबेडकरी चळवळीती निधन झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. किरण दाभाडे यांनी प्रास्ताविकात शहरात सुरु असलेल्या आरपीआयच्या कामाची माहिती दिली.
जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की, आरपीआयच्या माध्यमातून मागासवर्गीय, दुर्बल घटक व अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पक्षाचे संगठन योग्य प्रकारे केले जात असून, युवकांना संधी दिली जात आहे. युवक मोठ्या संख्येने पक्षात येत असून, एक युवा कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे. अमित काळे यांचे पक्षात सुरु असलेले उत्तम प्रकारे कार्य व युवकांचे संगठन पाहून त्यांना युवक जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना अमित काळे यांनी संपुर्ण जिल्ह्यात गाव तेथे आरपीआयची शाखा उघडण्यास युवक महत्त्वपुर्ण भूमिका बजावणार आहेत. पक्षात काम करणार्यास संधी असून, युवकांनी आरपीआयच्या प्रवाहात सहभागी होऊन समाजाचे प्रश्न सोडविण्याचे युवकांना आवाहन केले. तसेच प्रत्येक तालुक्यात युवकांचे संगठन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल आरपीआय (गवई) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, संतोष पाडळे, दानिश शेख, माणस प्रतिष्ठानचे विशाल बेलपवार, दिपक गायकवाड, अमोल पाटोळे, कृपाल भिंगारदिवे, विशाल साबळे, गौतम कांबळे, संदीप वाघमारे, दया गजभिये यांनी त्यांचे अभिनंदन केले. या नियुक्तीबद्दल काळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.