सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने आयुक्त यांना निवेदन
बेघर कुटुंबाना स्वतःचे घर मिळावे व ॲम्युनिटी प्लॉट मध्ये झालेले अतिक्रमण काढून लहान मुलांसाठी बगीचा व महापुरुषांचे पुतळे बसवावे- बाळासाहेब वाघमारे.
अहिल्यानगर – मौजे बोल्हेगाव गावठाण येथील सर्वे नं.८७/१अ. पैकी क्षेत्र २ हेक्टर ५ आर ही जागा महाराष्ट्र शासनाची असून ती शासनाच्या ताब्यातच आहे. ती जागा मनपा ने घ्यावी व ती जागा पडिक असून मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातीचे १५० कुटुंब गांधीनगर बोल्हेगाव गावठाण येथे सुमारे १५ ते २० वर्षापासून भाडेतत्त्वावर रहिवास करत आहे. त्यामुळे या जागेवर गोरगरिबांच्या घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात घेऊन योजना राबवण्यात यावी व मौजे नागापूर रेणुका नगर येथील गट नंबर १३/२ब /२क/३अ/३क ही जागा अम्युनिटी असून महानगरपालिकेच्या मालकीची असून त्यामध्ये अतिक्रमण झालेले आहे ते काढून सदरील अम्युनिटी प्लॉटचे सुशोभीकरण करून व लहान मुलांसाठी बगीचा करून महापुरुषांचे पुतळे बसवण्यात यावे या मागणीसाठी मनपा आयुक्त डांगे यांना सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे समवेत बेघर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, गांधीनगर बोलेगाव गावठाण येथे १५ ते २० वर्षापासून भाडेतत्त्वावर राहत असून हे कुटुंब बेरोजगार आहे. त्यामधील काही कुटुंबातील व्यक्ती हे भंगार गोळा करतात मजुरीचे काम करतात हमालीचे काम करतात असे वेगवेगळ्या प्रकारे आपले उपजीविका चालवीत आहे. परंतु त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसून हे भाड्याच्या घरात राहून भाडे भरावे लागतात तरी त्यांच्या उपजीविकेत पैसे कधी मिळतात तर कधी मिळत नाही अशा त्यांना भाडे भरणे परवडत नाही तरी बोल्हेगाव गांधीनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली पडीक जागा सुमारे १ एकर रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, यशवंत आवास योजना राबवण्यासाठी घरकुल साठी मिळावी त्यामुळे गोरगरीब जनता ही घराचे भाडे न भरता स्वतःच्या घरात जाइल व मौजे नागापूर येथील रेणुका नगर येथे गट नंबर १३/२ब/२क/३अ/३क ॲम्युनिटी ही जागा महापालिकेच्या मालकीची अम्युनिटी आहे सदरील अम्युनिटी प्लॉट काकासाहेब म्हस्के कॉलेज रोड आंबेडकर चौक सन फार्मा शाळा जवळ आहे तरी सदर अमेनिटीमध्ये सध्या काही अतिक्रमण केलेले गाळे आहे ते खाली करून तिथे शाळेतील व परिसरातील लहान मुलांसाठी आणि नागरिकांसाठी बगीचा तयार करण्यात यावा व थोर महापुरुषांचे पुतळे साहित्यरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे बसविण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.