“आता संगमनेरच्या रस्त्यांनाही ब्रेक नाही – आमदार खताळांचा दणका!”
"मोदी दिल्लीमध्ये, शिंदे-पवार मुंबईत... आणि आमदार खताळ मैदानात! संगमनेरचा विकास आता कुणीही थांबवू शकत नाही!"
“आता संगमनेरच्या रस्त्यांनाही ब्रेक नाही – आमदार खताळांचा दणका!”
संगमनेर | मेट्रो न्यूज
“मोदी दिल्लीमध्ये, शिंदे-पवार मुंबईत… आणि आमदार खताळ मैदानात!
संगमनेरचा विकास आता कुणीही थांबवू शकत नाही!”
असं ठणकावून मत आमदार अमोल खताळ यांनी धांदरफळ बुद्रुक येथे व्यक्त केलं.
संगमनेर ते अकोले राज्यमार्गाच्या मीनाक्षी बांगला ते रामेश्वर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार खताळ यांच्या हस्ते झाला.
वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी १० लाखांची निधी मंजूर झाली आहे. हे काम दर्जेदार व जलद पूर्ण व्हावं यासाठी ठेकेदारांना स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत.
“स्वातंत्र्यानंतरही हा रस्ता दुर्लक्षित… आता मात्र बदल सुरू!”
“नागरिकांची मागणी होती – आणि ती पूर्ण करताना मला अभिमान वाटतो,” असं आमदार खताळ म्हणाले.
“रस्ते, वीज, पाणी, आरोग्य – गावागावात विकासच विकास!”
“पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात मूलभूत सुविधांचा प्रश्न सुटणार आहे,” असा विश्वासही खताळ यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये –
रामभाऊ राहाणे, संजय मोरे, डॉ. महेंद्र कोल्हे, कमलेश डेरे, किशोर देशमुख, संतोष हांडे, समीर आहेर, सुरेश लांडगे, अनिल अभंग, महेंद्र कोकणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

“हा रस्ता फक्त डांबरी नाही, तर विकासाच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल आहे!” – आमदार खताळ