नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी तासाला 800 भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे दर्शन!!!!

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी  आतुर झालेल्या भाविकांसाठी खुशखबर

मुंबई:
           सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी  आतुर झालेल्या भाविकांसाठी खुशखबर आहे. नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला तासाला २०० ऐवजी ८००  भाविकांना सिद्धीविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.  सिद्धीविनायक मंदिर न्यासाने भाविकांसाठी ही दिलासादायक बातमी दिली आहे. १  जानेवारीला  नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने भाविकांसाठी प्रति तास २०० ऐवजी८०० भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. QR कोड असलेल्या भाविकांनाच या दर्शन सुविधेचा लाभ घेता येणार आहे.  QR कोड घेतलेला नसेल अशा भाविकांना  मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही.

 

 

बाप्पाच्या  दर्शनाची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२  आणि दुपारी १२. ३०  ते संध्याकाळी ७  आणि  रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग निर्माण झाल्याने राज्यातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. लॉकडाऊन करण्यात आल्याने मंदिरं आणि प्रार्थनास्थळंही बंद ठेवण्यात आले होते. तब्बल नऊ महिने राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे  बंद होती. ही मंदिरं सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, भाजप, मनसेपासून ते राज्यातील अध्यात्मिक संघटनांनीही आंदोलन केलं होतं. मात्र, कोरोनाचा संसर्ग पाहता सरकारने मंदिर सुरू करण्यास नकार दिला होता. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी होताच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंदिरं सुरू करून भाविकांना मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली झाली होती.१५ नोव्हेंबर रोजी सिद्धीविनायक मंदिरही भाविकांना दर्शनासाठी  सुरू झालं असून सध्या तासाला दररोज २०० भाविकांना  दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. फक्त 1 जानेवारी ला  संख्या २००  ऐवजी ८००  करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना आताच दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.