“बाळांच्या भवितव्यासाठी रस्त्यावर!” – साऊ एकल महिला समितीचा जामखेडमध्ये एल्गार, थकीत बालसंगोपन निधीसाठी आक्रमक पवित्रा!
"नोव्हेंबरपासून पै न मिळाला, आता एकल महिलांचा संयम सुटला!" जामखेडमध्ये आज साऊ एकल महिला समिती आणि स्नेहालय संस्थेच्या नेतृत्वाखाली एकल महिलांनी तहसील कार्यालयावर धडक दिली.

पोलीस न्यूज नेटवर्क | जामखेड
“नोव्हेंबरपासून पै न मिळाला, आता एकल महिलांचा संयम सुटला!”
जामखेडमध्ये आज साऊ एकल महिला समिती आणि स्नेहालय संस्थेच्या नेतृत्वाखाली एकल महिलांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा थकीत निधी तातडीने वितरित करा, अशी आक्रमक मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
काय आहे मुद्दा?
राज्यात सुमारे १.१० लाख एकल महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी मिळणारी बालसंगोपन मदत नोव्हेंबर २०२४ पासून बंद आहे.
शिक्षणाचे हक्काचे पैसेच मिळत नसल्यामुळे –
- पुस्तकं, वह्या, गणवेश खरेदी करता येत नाहीत
- फी भरता येत नाही
- आर्थिक अडचणीत मुलांचं शिक्षण धोक्यात!
सरकार काय म्हणतंय?
“निधी नाही…” – अशी सवयीची कारणं सरकारकडून दिली जात आहेत, असा आरोप समितीने केला.
पण महिलांचा सवाल आहे, “मग आमच्या मुलांचं काय?”
एकल महिला समितीचा इशारा:
“जर तात्काळ निधी वितरित केला नाही, तर तीव्र आंदोलन करू!”
— असा स्पष्ट इशारा निवेदनात दिला आहे.
प्रमुख मागण्या:
थकीत रक्कम तात्काळ जमा करा
शिष्यवृत्ती नियमित दर महिन्याला द्या
प्रलंबित अर्ज मंजूर करा
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुलभ करा
पात्र लाभार्थ्यांची नोंदणी व पडताळणी त्वरीत पूर्ण करा
“ही योजना म्हणजे गरीब कुटुंबातील मुलांचं भविष्य!”
सरकारने याकडे गांभीर्याने पाहावं, अशी नम्र विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी, आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.
या लढ्यात सहभागी स्वाक्षऱ्या:
नासिर सय्यद, योगेश अब्दुले, प्रतिभा धेंडे, नय्युम सुभेदार, अनिता ढोले, सरस्वती शिरोळे, अंजली आढाव, अंजुम पठाण, उषा खवळे, शबाना इनामदार, सचिन टाक, सूर्यकांत सदाफुले, मनीषा जावळे आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व एकल महिला.
हा मुद्दा फक्त एका तालुक्याचा नाही – तो हजारो मातांचा आणि लाखो बालकांच्या भविष्याचा आहे!