ऋषिकेश राऊत
पुणे
पुण्यातील भांबुर्डा विभागाच्या प्रश्नांबाबत अनेक सामाजिक संस्था यांच्याकडून वारंवार निवेदन उपसभापती कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यामध्ये तेथील प्रश्न सोडवण्यासाठी यासर्वांनी विनंती केली होते. त्याअनुषंगाने उपसभापती विधानपरिषद ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज भांबुर्डा आणि पुणे रेंज मधील विविध टेकड्या ह्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली.
या टेकड्यांचे संगोपन वन विभागाने कसे केलेले आहे? तसेच अनेक सामाजिक संस्थांना वृक्ष लागवड करायची इच्छा आहे त्याबाबत वनविभागाचे धोरण काय आहे ? काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे का ? हे पाहणे आवश्यक असल्याने आज या ठिकाणी डॉ गोऱ्हे यांनी भांबुर्डा वनविभागाला भेट दिली. यावेळी पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील उद्याने सर्वांसाठी कोरोनाचे नियमाचे पालन करून सर्वांसाठी खुले करावे अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी उपस्थित वन अधिकाऱ्यास केल्या.
यावेळी वनक्षेत्रपाल श्री प्रदीप संकपाळ, श्री शिरीष फडतरे – सदस्य फी वाढ नियामक मंडळ, डॉ शैलेश गुजर व इतर अधिकारी उपस्थित होते. वन विभाग हा शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग असून अनेक सामाजिक उपक्रम या विभागामार्फत राबविला जातात या योजनांची माहिती डॉ गोऱ्हे यांनी घेतली.