मोत्याचा भाव, पण शेतकऱ्यांचे हाल! डाळिंबाला मिळतोय 200 रु किलो दर, पण नफा जातो दलालांच्या घशात!

अतिवृष्टी + रोगांचा कहर = उत्पादनात मोठी घट

मोत्याचा भाव, पण शेतकऱ्यांचे हाल! डाळिंबाला मिळतोय 200 रु किलो दर, पण नफा जातो दलालांच्या घशात!

📍
जवळा, अहिल्यानगर जिल्हा
गोड चव, आकर्षक रंग आणि टिकाऊपणामुळे जगभर मागणी असलेल्या डाळिंबाला सध्या बाजारात मोत्याचा भाव मिळतोय. काही ठिकाणी डाळिंबाचे दर तब्बल ₹150 ते ₹200 प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत. पण दुर्दैव म्हणजे, हा नफा शेतकऱ्यांच्या नाही, तर दलाल व व्यापाऱ्यांच्या खिशात जातोय!

🌧️ अतिवृष्टी + रोगांचा कहर = उत्पादनात मोठी घट
या वर्षी अनियमित हवामान, बुरशीजन्य रोग व कीड प्रादुर्भाव यामुळे डाळिंब शेती संकटात आली. तेजससारख्या रोगांमुळे झाडं सुकतायत, मुळं कुजतायत आणि फळं काळवंडून जात आहेत. परिणामी उत्पादन घटलं आणि दर वाढले, पण खर्च मात्र डोंगरासारखा वाढतोय.

💸 डाळिंब शेती म्हणजे उच्चभ्रू शेतकऱ्यांचीच मक्तेदारी?
एक फळ काढायचं असेल तर १०-१५ फवारण्या कराव्या लागतात. औषध, मजूरी आणि मजल दरमजल करत डाळिंब मिळालं तरी दलाल दर ठरवतात. 800-1000 रुपये मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना आज 4000-5000 रुपये खर्च करावा लागतोय.

🚨 शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच!
ठोक बाजारात मोजमापात गडबड, दरात लूट आणि दलालांचा फायदा – यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. उत्पादक शेतकरी म्हणतात, “मेहनत आमची, नफा व्यापाऱ्यांचा!

📢 शेतकऱ्यांची मागणी : सरकारने औषधांवर मदत योजना सुरू करावी!
“हवामानाच्या लहरीपणाशी झगडत शेती करणं म्हणजे तपस्याच. पण यासाठी सरकारने फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांवर सबसिडी योजना राबवली पाहिजे,” असं जवळा येथील शेतकरी सचिन विटकर यांचं म्हणणं आहे.

👉 ही बातमी शेअर करा, आणि शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवा! #PomegranateCrisis #FarmerVoices #MetroPortalMarathi 💬🍎