पिंपरी चिंचवड शहर मनसेचा कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा

शहराध्यक्ष चिखले यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

पुणे (वैष्णवी घोडके)

सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हाकेला साद देत पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना मदत करण्यात आली. प्रामुख्याने पुरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु भांडी, अंन्नधान्य, साड्या, औषधे, गुडनाईट/मॉर्टिन कॉइल, बिस्किटे, बिसलेरी पाणी, फिनेल, साबन याचा समावेश होता.

 

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

पिंपरी चिंचवड शहर मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी मधील खेड तालुक्यातील कुंभार वाडा आणि ब्राम्हण आळी तसेच चिपळूण तालुक्यातील चारगाव खांदाट, भोईवाडी,दळवटणे बागवाडी, इंगवलेवाडी,खेर्डी एम. आय. डि. सी. मफतलाल चाळ, खेर्डी मोहल्ला, खेर्डी सुर्वे चाळ या ठिकाणी वाटप करण्यात आले व पुरग्रस्त विविध भागातील पाहणी केली.