राज्याला मिळाले ६२० नवे पोलिस उपनिरीक्षक!
महाराष्ट्र : १२४ व्या बॅचच्या ६२० पोलिस उपनिरीक्षकांनी १२ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचा दीक्षान्त समारंभ त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमीत शुक्रवारी पार पडला. यातून ४१० पुरुष, २१० महिला पोलिस दलात समाविष्ट झाले. ‘पीडितांचे संरक्षण अन् दुष्टांचा नाश’ करण्याची शपथ त्यांनी घेतली. प्रशिक्षणात उत्कृष्ट सेवा बजावणारे सागर लगड (अहिल्यानगर), नेहा कोंडेकर (कोल्हापूर), अभय तेली (सिंधदुर्ग), अक्षय झगडे (सिन्नर), कृष्णा घेबडे (अहिल्यानगर) यांचा विशेष सन्मान झाला. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थ्याचा पुरस्कार नेहा कोंडेकर यांना देण्यात आला. आमदार श्रीकांत भारतीय यांची ‘तर्पण’ फाउंडेशन संस्था अनाथांसाठी काम करते. संस्थेने दत्तक घेतलेल्या पाच मुलांनीही प्रशिक्षण पूर्ण केले.