रत्नापूर ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप!
जामखेड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या रत्नापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावरून राणी लक्ष्मण जाधव यांना गमवावे लागले आहे .
रत्नापूर ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप!
जामखेड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या रत्नापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावरून राणी लक्ष्मण जाधव यांना गमवावे लागले आहे .पद! कारणही तितकंच चर्चेत –
तिसऱ्या अपत्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी त्यांचं सरपंचपद व सदस्यत्व रद्द केलं आहे.
22 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या या निर्णयाने तालुक्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. यामागे केवळ कायदेशीर मुद्दा नसून थेट राजकीय समीकरणं हादरवणारा धक्का बसल्याचं बोललं जातंय.
पवारांना की वारेंना धक्का?
राणी जाधव या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय चारे यांच्या गटातील आहेत. त्यामुळे हा धक्का आ. रोहित पवार यांना बसलाय की दत्तात्रय वारे यांना? यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
कारण, रत्नापूर ग्रामपंचायतीवर वारे गटाचं वर्चस्व होतं आणि त्या माध्यमातून रोहित पवारांचा प्रभाव होता. पण गेल्या काही महिन्यांपासून दत्तात्रय वारे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला रामराम करून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) किंवा शिवसेना (शिंदे गट) यापैकी पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
-
सप्टेंबर 2022 मध्ये राणी जाधव सरपंचपदी निवडून आल्या.
-
10 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना तिसरं अपत्य झालं.
-
यानंतर गावातील श्रीकांत रामचंद्र पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
-
पुरावे (गरोदर माता नोंदणी, वैद्यकीय दाखले, गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल) सादर करण्यात आले.
-
अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्यानुसार त्यांचं पद रद्द करण्याचा आदेश दिला.
वारे यांच्या पुढच्या राजकीय चाल?
दत्तात्रय वारे सध्या प्रचंड पेचात आहेत.
-
भाजपमध्ये जाण्याचा कल आहे, पण तिथे स्पर्धक आणि जुने वैरी वाढतील, ही भीती!
-
राष्ट्रवादी (अजित पवार गट) किंवा शिवसेना (शिंदे गट) हेदेखील पर्याय आहेत.
-
भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनी त्यांना “ओपन ऑफर” दिली असली, तरी जुनी टीका वारे विसरतील का, हा मोठा प्रश्न आहे.