ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत देवदत्त गुंडू ने 1 सिल्व्हर, 3 ब्राँझ मेडल पटकावले

नगर – गुजरात येथे झालेल्या ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत अहिल्यानगरचे चि.देवदत्त प्रविण गुंडू यांनी 100 किलो वजनी गटात एक सिल्व्हर आणि तीन ब्राँझ मेडल पटकावले.   या स्पर्धेत चार इव्हेंट होते. यामध्ये पूर्ण पॉवरलिफ्टिंग, पुश-पुल, ओन्ली डेडलिफ्ट, ओन्ली बेंच प्रेस हे इव्हेंट होते. यात देवदत्त गुंडूने उत्तम कामगिरी करुन हे यश मिळविले.

या ओपन आशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत अहिल्यानगरमधून तीन खेळाडूंची निवड झाली होती.  या स्पर्धेत आशिया खंडातील 40 हून जास्त देशातील खेळाडू सहभागी झाले होते.यापुढील होणार्‍या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी चि.देवदत्त प्रविण गुंडू हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

चि.देवदत्त गुंडू ला स्पर्धोसाठी युनायटेड पॉवर लिफ्टींग असो.महाराष्ट्रचे अध्यक्ष सचिन टापरे, उपाध्यक्ष मनोज गायकवाड, अदनान बदाम, राष्ट्रपती पुरस्कार विजेते मधुकर गायकवाड, सोहेल शेख, सद्दम सय्यद, अयनुल सय्यद, राजू थोरात व मुंबई पॉवर लिफ्टिंग असो.चे अध्यक्ष सौरभ चौधरी व उपाध्यक्ष शितल चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होते आहे.