हस्तांतरणात अडकली गरोदर महिलांची नोंदणी; काहींना मिळेना पैसे!

अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांचा आवाज दाबला जातोय का?

🟠
हस्तांतरणात अडकली गरोदर महिलांची नोंदणी; काहींना मिळेना पैसे!
📍 अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांचा आवाज दाबला जातोय का?

👶🏻 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना – गरोदर व स्तनदा मातांसाठी सुरु झालेली योजना आज नोंदणी अडचणींमुळे ठप्प!

📅 २०१७ पासून सुरु असलेली योजना
💰 लाभ: पाच हजार रुपयांची आर्थिक मदत
🎯 गरजूंना पोहोचायचं होतं सरकारचं पाठबळ… पण काय खरंच पोहोचलं?


🔴 मुख्य अडचण:
➡️ योजना आता महिला व बालकल्याण विभागाकडे हस्तांतरित
➡️ त्यामुळे अंगणवाडी सेविका की आशा सेविका – कोण नोंदणी करणार? यावरच संभ्रम!
➡️ महिनाभरांपासून अनेक महिलांची नोंदणीच थांबलेली आहे!


🖥️ ऑगस्ट २०२३ पासून नवीन पोर्टल कार्यान्वित!
👧 दुसऱ्या अपत्यासाठी – जर मुलगी असेल, तर लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ६ हजार रुपये
🤰 पहिल्या हप्त्याकरिता – नोंदणी १०० दिवसांत, एक तपासणी आवश्यक – ३ हजार रुपये
👶 दुसरा हप्ता – लसीकरण पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये


📊 योजनेचा आतापर्यंतचा जिल्हा अहवाल:
🔸 जुनं पोर्टल (2017-2023):
▪️ 1.53 लाख लाभार्थी
▪️ 66.26 कोटी रुपये DBT
🔸 नवीन पोर्टल (2024-2025):
▪️ 52,160 लाभार्थी
▪️ 22.24 कोटी रुपये DBT


⚠️ वास्तविक समस्या:
🔹 391 जुने लाभार्थी अजूनही पैशाची वाट पाहतायत!
🔹 नवीन पोर्टलवरही 300 ते 400 महिलांना लाभ मिळालेला नाही!
🔹 ज्यांनी वर्षांपूर्वी नोंदणी केली त्यांना फक्त 2 हजार रुपयेच?

 

👩‍💼 नोंदणी अधिकार आता अंगणवाडी सेविकांकडे दिला जाणार.
त्यांना लॉगिन मिळाल्यानंतरच प्रक्रिया सुरू होईल, असं प्रशासन म्हणतंय.