आर. प्रज्ञाननंदाची सलग दुसरी बुद्धिबळ लढत ड्रॉ!

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञाननंदाने येथे प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या फेरीत तुर्कीच्या गुरेल एडिज याच्याविरुद्ध लढत ड्रॉ करत गुणांची विभागणी केली. तर अरविंद चिदंबरमने काळ्या मोहरांसह खेळताना जर्मनीचा विन्सेंट किमर याला पराभूत केले. पहिल्या फेरीत झेक प्रजासत्ताकचा ग्रँडमास्टर गुयेन थाई दाई वान याच्याविरुद्ध बरोबरी करणाऱ्या अरविंदने काळ्या मोहरांसह आपला पहिला विजय मिळवला. अरविंद या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत विजय मिळवणारा एकमेव खेळाडू ठरला.