भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञाननंदा संयुक्त अव्वलस्थानी!

भारतीय ग्रँडमास्टर  प्रज्ञाननंदाने सलग दुसरा विजय मिळवत प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्याच अरविंद चिदंबरमसह संयुक्तरीत्या अव्वल स्थान गाठले. पहिल्या दोन फेरीत ड्रॉ वर समाधान मानावे लागलेल्या प्रज्ञाननंदाने, जोरदार मुसंडी मारत नंतरच्या दोन फेऱ्यांत विजय मिळवले. चौथ्या फेरीत त्याने जर्मनीच्या विन्सेट केमेरचा पराभव केला. अरविंद चिदंबरम आणि अमेरिकेचा सॅम शांकलँड यांच्यातील सामना ड्रॉ झाला.