रेल्वे स्टेशन रोडला मिळणार आरोग्यकेंद्र आणि नवसंजीवनी!

आयुक्त यशवंत डांगे यांची पाहणी, पॅचिंग कामालाही गती

 रेल्वे स्टेशन रोडला मिळणार आरोग्यकेंद्र आणि नवसंजीवनी!
आयुक्त यशवंत डांगे यांची पाहणी, पॅचिंग कामालाही गती

📍
 अहिल्यानगर | अपडेट्स LIVE
रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी! आता स्टेशन रोडवर लवकरच नवीन महापालिकेच्या आरोग्य केंद्राचे काम सुरू होणार आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः या जागेची पाहणी केली.

🏥 आरोग्य केंद्राची मागणी नागरिकांच्या आरोग्याच्या गरजेतून माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी केली होती आणि ती मंजूरही झाली आहे. या भागात मोठी वस्ती, रहदारी, रेल्वे प्रवासी आणि मालवाहतूक यामुळे आरोग्य सुविधा अत्यंत गरजेच्या होत्या.

🛣️ रस्त्यांचा प्रश्नही मार्गी!
कायनेटिक चौक ते शिवनेरी चौक आणि यश पॅलेस हॉटेल ते स्टेशन दरम्यानचे रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. यामुळे नागरिक त्रस्त होते. माजी नगरसेवक दीपक खैरे यांच्या पाठपुराव्यामुळे आयुक्त डांगे यांनी तातडीने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि पॅचिंगचं काम सुरू करण्याचे आदेश दिले.

⚰️ अमरधाममधील अंत्यविधीची सोय सुधारणार
रेल्वे रोडवरील अमरधाममध्ये अंत्यविधी करताना येणाऱ्या अडचणींचाही प्रश्न उपस्थित झाला. स्वच्छतेचा अभाव आणि सुविधा नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. यावर उपाय म्हणून मसनजोगी समाजातील नागरिकाला तिथे नियुक्त करण्याची मागणी माजी महापौर शीला शिंदे यांनी केली.

👥 या बैठकीत माजी उपमहापौर गीतांजली काळे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, सुवर्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

🗣️ आता आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि वाहतुकीच्या अडचणींवर एकाचवेळी काम सुरू झाल्यामुळे स्थानिकांना

🎓 पेन्शनर शिक्षकांचा ऐतिहासिक दिल्ली दौरा – खासदार लंके यांच्या पुढाकाराने ‘गुरुवर्यांना’ नवा सन्मान!

📍 अहिल्यानगर LIVE अपडेट्स
शिक्षण क्षेत्रात आयुष्य झोकून देणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांसाठी खासदार निलेश लंके यांनी एक ऐतिहासिक आणि भावनिक पुढाकार घेतला आहे. तब्बल 200 पेन्शनर शिक्षकांना स्वतः दिल्ली दौऱ्यावर घेऊन गेले असून, त्यांच्या वेतन, पेन्शन आणि वैद्यकीय सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर थेट पंतप्रधान, अर्थमंत्री आणि खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.

🚂 दिल्लीकडे रेल्वेने रवाना होताना स्टेशनवरचा माहोल अगदी भावनिक! अनेक शिक्षक पहिल्यांदाच राजधानीला भेट देणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

👨‍🏫 “शिक्षक म्हणजे माझी प्रेरणा. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी मी सदैव काम करेन,” असं खासदार लंके यांनी नम्र शब्दांत सांगितलं. त्यांचे वडीलही शिक्षक असल्याने हा दौरा केवळ राजकीय नाही, तर वैयक्तिक भावनिक नात्यानेही जोडलेला आहे.

🗣️ बन्सी उबाळे म्हणाले – “लंके साहेबांनी शिक्षकांसाठी घेतलेला पुढाकार म्हणजे मुलाने वडिलांसाठी उचललेली सामाजिक जबाबदारी!”

💼 दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि खासदार शरद पवार यांच्याशी थेट संवाद साधून सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न मांडले जाणार आहेत.

🕌 या दौऱ्यात संसद, राष्ट्रपती भवनासह ऐतिहासिक स्थळांचाही आनंद लुटता येणार आहे. प्रवास, निवास आणि भोजनाची संपूर्ण जबाबदारी खासदार लंके यांच्याकडून.

🙏 शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून हे सांगता येतं – गुरुंचा सन्मान हीच खरी गुरुदक्षिणा!