“शिकले-सवरलेले” पण फसले! Infanite Scam: हजारो नोकरदार, पोलिस, शिक्षक गुंतवले… आता पैसेच गायब!
अशा आकर्षक घोषवाक्यांमागे लपलेला होता शेकडो कोटींचा Infanite Multi-State Scam.
“शिकले-सवरलेले” पण फसले!
Infanite Scam: हजारो नोकरदार, पोलिस, शिक्षक गुंतवले… आता पैसेच गायब!
क्राईम डायरी | सचिन दसपुते
“बचतीकडून समुद्रिकडे, गुंतवणुकीतून सामर्थ्याकडे” – अशा आकर्षक घोषवाक्यांमागे लपलेला होता शेकडो कोटींचा Infanite Multi-State Scam. नवनाथ औताडे आणि त्याच्या टिमने तयार केलेल्या नकली कंपन्यांद्वारे राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे.
मोबाइल अॅप,
१५% मासिक परतावा,
1 लाख गुंतवणुकीवर 1,000 रुपयांचं एजंट कमिशन – या मोहजालात पोलीस, शिक्षक, उद्योजक आणि सामान्य नागरिक गुंतले.
श्रीगोंदा, पारनेर, पुणे, सोलापूरसह राज्यभर यांचं नेटवर्क पसरलं. अगदी पोलीस अधिकारी उद्घाटनात हजेरी लावत होते, त्यामुळे स्कीमला कायदेशीर मान्यता असल्याचा आभास निर्माण झाला.
एक दिवसात सगळं संपलं!
तीन वर्षं परतावा दिला, लोकांचा विश्वास मिळवला. एक दिवस परतावा थांबला… आणि संचालक गायब!
हजारो गुंतवणूकदार आजही हवालदिल आहेत. ना पैसे मिळाले, ना न्याय.
पोलीसही फसले, मग न्याय कुणाकडून?
या प्रकरणात पोलिस खात्यातील अधिकारी आणि कर्मचारीही गुंतले होते. काहींनी तर इतर सहकाऱ्यांना यामध्ये ढकललं! आता लोक विचारतायत – “स्वतः फसलेले अधिकारी इतरांना न्याय कसा देतील?”
सिस्टम फेल?
गुन्हे श्रीगोंदा व तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल
पण अजूनही प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग नाही
तपास थांबलेला, आरोपी पसार, दुबई कनेक्शनचीही चर्चा
CBI किंवा EDसारख्या यंत्रणांची गरज!
धडा घ्या!
आकर्षक परतावा = धोका
शिक्षित लोक गुंतले म्हणजे स्कीम खरी असते, हा गैरसमज फसवतो
पुढच्या वेळी कुठल्याही योजनेत गुंतवणूक करण्याआधी फॅक्ट चेक करा
#InfaniteScam #FraudAlert #InvestmentScam #MetroExpose #FinancialFraud #EducatedButFooled #PonziScheme #JusticeForInvestors

एक दिवसात सगळं संपलं!
पोलीसही फसले, मग न्याय कुणाकडून?
सिस्टम फेल?
धडा घ्या!