मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी बुधवारी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमधील समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायालय मूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. मुख्य सचिव सुजाता सोनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्ती बाबतचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांचा आदेश वाचून दाखवला.शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमती आर, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.