एसटी कामगारांचे, नऊ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन
मुंबई : ‘राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके एसटी कर्मचाऱ्यांना ही वेतन द्या’ या मागणीसाठी एसटी कामगार संघटना, संयुक्त कृती समितीतर्फे येत्या 9 ऑगस्टपासून राज्यभर आगार आणि विभागीय पातळीवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाचे रूपांतर संपात झाले. तर ऐन गणपतीच्या मोसमापूर्वीच एसटीची वाहतूक पुन्हा दीर्घकाळासाठी कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या सणावारांच्या दिवसांचा आढावा घेऊन शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करणे आता गरजेचे झालेले आहे.