महाराणी येसूबाईच्या भूमिकेबद्दल रश्मिका भावुक

 मनोरंजन : पुष्पा २’ आणि ‘ॲनिमल’ नंतर आता रश्मिका मंदाना ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती महाराणी येसूबाईची भूमिका साकारत आहे. रश्मिकासाठी ही भूमिका केवळ अभिनय नाही, तर तिच्यासाठी हा एक भावनिक प्रवास ठरला आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात रश्मिका खूप भावुक झाली आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना रश्मिकाने सांगितलं की, “महाराणी येसूबाई या एका परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं प्रतिनिधित्व करतात. दक्षिण भारतातील मुलगी असूनही एका मराठा राणीचं पात्र साकारण्याची जबाबदारी माझ्यावर आली. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे.” ट्रेलरमध्ये रश्मिकाचा मराठा राणीचा आत्मविश्वास, रॉयल लूक आणि तिची संयमित देहबोली प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, विकी कौशल या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा भव्य ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला असून, प्रेक्षक आता १४ फेब्रुवारीला या ऐतिहासिक पर्वाची वाट पाहत आहेत.