१४९ शिक्षकांनी गैरसोयीमुळे नाकारले मुख्याध्यापक पदाचे प्रमोशन

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या तब्बल १४९ शिक्षकांनी गैरसोय नियुक्ती ठिकाणची गैरसोय टाळण्यासाठी मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीला नकार दिला. त्यामुळे शिक्षण विभागाने पदोन्नत्या स्विकारणाऱ्या ८९ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर नियुक्ती दिली. अशा एकूण १३० जणांणा नियुक्ती देण्यात आली. शिक्षण आयुक्तांनी ३० जुलैला शिक्षण विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाला ८९ मुख्याध्यापकांचे प्रमोशन करायचे होते, त्यासाठी ५०० शिक्षकांची ज्येष्ठता यादी तयार ठेवली होती. परंतु, पदोन्नती घेताना नियुक्तीचे ठिकाणी सध्याच्या ठिकाणापेक्षा दूरचे किंवा गैरसोयीचे असल्याने बहुतांश शिक्षकांनी ही पदोन्नती नाकारली. तसेच एका विस्तार अधिकाऱ्यानेही पदोन्नती नाकारली. पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी रिक्त पदांच्या रूपांतरीत फेरीतील शिफारस असलेले उर्दू माध्यमाच्या १८ जणांना उपाद्यापक, विज्ञान समुहातील १० शिक्षकांना पदवीधर शिक्षक तसेच पटसंख्येच्या आधारे शिक्षण सेवकपदी पदस्थापना दिली. विस्तारअधिकारी श्रेणी तीन पदावर १३ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली. ही नियुक्ती मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपमुख्यकार्यकरी अधिकारी राहुल शेळके, उपशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे, संभाजी भदगले यांनी केली.