तांबे VS खताळ VS थोरात — संगमनेरच्या राजकारणात तिहेरी भूकंप!
Share
‘नातेवाईक विरुद्ध नातेवाईक’ महामुकाबला!
तांबे VS खताळ VS थोरात — संगमनेरच्या राजकारणात तिहेरी भूकंप!
संगमनेरमध्ये यंदाची नगराध्यक्ष निवडणूक अक्षरशः राजकीय कुरुक्षेत्र ठरत आहे.
दशकानुदशकांचा काँग्रेसचा वर्चस्व, घराण्यांची सत्ता, नातेवाईकांची थेट धडक…
आणि सर्वात महत्त्वाचं — प्रत्येक गटाची प्रतिष्ठा पणाला!
तांबे गटाची सर्वात मोठी एन्ट्री – आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी मैदानात!
विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी उमेदवारी दाखल करून राजकीय वातावरण तापवलं आहे. तांबे घराण्याच्या प्रतिष्ठेची ही थेट लढत मानली जाते.
याच रणांगणात दुसऱ्या बाजूला आहेत महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ. तांबे VS खताळ संघर्ष आता थेट परिवारांपर्यंत पोहोचला आहे!
थोरात घराण्याची सरप्राइज एन्ट्री – राजकीय समीकरणेच उलटी?
संगमनेरचा पर्याय बनलेले बाळासाहेब थोरात आणि त्यांचे कुटुंबही या हाय-प्रोफाईल लढाईत उतरलं आहे.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे यांनीही उमेदवारी भरली आहे.
आता तांबे VS खताळ VS थोरात — अशी त्रिकोणी मोठी टक्कर!
काँग्रेसने अधिकृत उमेदवारच न दिल्याने कलाटणी!
दशकानुदशकं सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसने यावेळी अधिकृत उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय हा गेमचेंजर मानला जातो. खरी समीकरणे अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच कळणार…
Rahuri Election 2025: बर्डे VS मोरे VS पवार — तुफान चुरस!
संगमनेरपासून राहुरी-राहातापर्यंत राजकीय समीकरणे फार वेगाने बदलत आहेत!
नातेवाईकांचे रिंगण, घराणी विरुद्ध घराणी, जुनी वर्चस्वं, नवीन गट —
या निवडणुका महाराष्ट्रातील सर्वात ड्रामॅटिक आणि निर्णायक ठरणार आहेत!