२० वर्षांनंतर ‘रियुनियन’ आणि शाळेसाठी लाखमोलाची भेट!

SSC 2005 बॅचकडून शिवाजी विद्यालयाला १ लाख रुपये किमतीचे बेंच भेट!

२० वर्षांनंतर ‘रियुनियन’ आणि शाळेसाठी लाखमोलाची भेट!
SSC 2005 बॅचकडून शिवाजी विद्यालयाला १ लाख रुपये किमतीचे बेंच भेट!

🗓️
 ११ जुलै, जामखेड –
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या SSC मार्च 2005 बॅचचे स्नेहसंमेलन तब्बल २० वर्षांनंतर दिमाखात पार पडले. जवळपास ८० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एक भावनिक क्षण अनुभवला.

या खास दिवशी त्यांनी एक जबरदस्त उदाहरण समाजासमोर ठेवले – शाळेला ₹१ लाख किमतीचे ३० नवे बेंच भेट देऊन आपल्या गुरुकुलाचे ऋण फेडले. शाळेने दिलेल्या आठवणींना कृतीतून उत्तर देणारे हे विद्यार्थी खरे ‘रिअल हिरो’ ठरले!

📍 स्थान: शिवाजी विद्यालय, जामखेड
🔔 शाळेची घंटा वाजली, परिपाठ झाला – अगदी जुन्या दिवसांसारखा!
👨‍🏫 माजी मुख्याध्यापक सदाफुले सर यांनी परिपाठ घेतला.

🎤 सहभागी:

  • शाळा कमिटीचे अध्यक्ष शहाजी पाटील, सदस्य दत्तात्रेय हजारेगौतम मते, प्राचार्य जोरे सर
  • विकी मंडलेचा आणि अनिल मते यांचे विशेष सहकार्य
  • दादा नामदेव लोंढे यांनी स्टेज बांधून देण्याचे जाहीर केले

कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संतोष सरसमकर यांनी नेटके सूत्रसंचालन केलं, तर रसिका वाळके यांनी आभार मानले.

👥 स्नेहसंमेलनात उद्योग, शिक्षण, आयुष्य या विषयांवर चर्चा झाली. आणि हो, जुन्या कट्ट्यावर बसून खूप साऱ्या आठवणीही शेअर झाल्या!

✨ या उपक्रमातून एक गोष्ट नक्की पटली –
शाळा घडवते माणूस, आणि माणूस घडवतो समाज.

 

📢 ह्या प्रेरणादायी रियुनियनची स्टोरी सगळीकडे पोहोचवा!