वाळू माफियांवर धडाकेबाज छापा!

61 लाखांचा मुद्देमाल जप्त – एक आरोपी अटकेत

🚨
 वाळू माफियांवर धडाकेबाज छापा!

61 लाखांचा मुद्देमाल जप्त – एक आरोपी अटकेत

अहिल्यानगर:
जिल्ह्यात बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर आता कायद्याचा चांगलाच बडगा उगारणं सुरू झालंय! परिविक्षाधीन उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली नगर एमआयडीसी पोलिसांनी नांदगाव परिसरात मध्यरात्री जोरदार कारवाई केली.

🕵️ गुप्त माहितीच्या आधारे खाडे आणि उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या पथकाने संपूर्ण रात्र तळ ठोकला. पहाटे अवैध वाळू उपसा करणारे चार डंपर आणि कामगार आले, आणि लगेचच पोलिसांनी छापा टाकत 61 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला!

🔹 जप्त मुद्देमालात:

  • 4 डंपर
  • 8 ब्रास वाळू
  • 1 आरोपी अटकेत
  • एकूण 7 आरोपींचा तपास सुरू

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्ह्यात संतोष खाडे यांचा अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाईचा ट्रॅक रेकॉर्ड आता चर्चेचा विषय बनला आहे.

⚠️ मटका, अवैध दारू विक्री, मावा, आणि आता वाळू माफियांवर धडक!
या पथकाच्या कामगिरीमुळे गुन्हेगारी जगतात चांगलीच खळबळ माजली आहे.

🛑 तरीही अजूनही काही भागांमध्ये वाळू उपसा सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून पुढील कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

📢 कायदेशीर मार्ग सोडून नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करणाऱ्यांना आता कोणतीही सूट नाही!