श्रीगोंद्यात रस्त्यांची खड्डेगिरी! ![💥]()
खर्च कागदावर… खड्डे मात्र रस्त्यावर!
दादा सोनवणे | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव – टाकळी कडे रस्ता पुन्हा एकदा खड्ड्यांनी गिळंकृत केला आहे!
काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बनवलेला हा रस्ता पहिल्याच पावसात तुटला.
नागरिकांचा जळफळाट:
- “पैसे खर्च झाले फक्त कागदावर, आमच्यासाठी रस्ता खड्ड्यात!”
- अपघातांची मालिका सुरु
![🚨]()
- वाहने रस्त्यावर बंद पडतायत, ट्रॅफिक जाम
![🔥]()
- दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात
![🛑]()
रस्त्याच्या नवीन डांबरीकरणाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लोक म्हणतात – “रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे?”
संतप्त ग्रामस्थांचा इशारा:
“रस्ता तातडीने नव्याने व दर्जेदार बनवा, नाहीतर आंदोलन पेटणार!”
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विजय होके यांनी आश्वासन दिलं – “पाऊस थांबताच ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेतल्याशिवाय बिले अदा केली जाणार नाहीत.”
पण प्रश्न असा की, तोपर्यंत नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करायचा का?



