द्वारकामाई साई मंदिरात २२ व २३ जुलै ला “साई उत्सव २०२१”

साई भक्तांसाठी भजनसंध्या आणि महाप्रसाद

                            साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, संदेशनगर  च्या वतीने,  दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त “साई उत्सव” हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम छोट्या प्रमाणत घेणयात येणार आहे. यंदाचा  “साई उत्सव  २०२१” हा कार्यक्रम येत्या २२ आणि २३ जुलै रोजी द्वारकामाई साई मंदिर, या ठिकाणी  आयोजित केला आहे. या निंमित्त सर्व  साई भक्तांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान चे सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे यांनी केलय.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

 

 

                       २२ जुलै रोजी सायंकाळी भजनसंध्या आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे. साई उत्सव तसेच २३ जुलै रोजी होमहवन, भजनसंध्या आणि महाप्रसाद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व साई भक्तांनी सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुपौर्णिमा उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन ही पिंपळे यांनी केलेय. द्वारकामाई साई मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे, या साठी भक्तांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन पिंपळे यांनी केलंय. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या हस्ते  श्री साई बाबांची आरती यावेळी संपन्न झाली.