कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सत्कार.
कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सत्कार.
अहमदनगर शहरातील सर्व हॉस्पिटल मध्ये दोन तास पुरेल एवढा ऑक्सीजन शिल्लक राहिला असताना एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पी.आय.युवराज आठरे व पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्रनाथ पांढरकर यांनी एमआयडीसी इंडस्ट्रियल मध्ये जाऊन विविध कंपन्यांमधून 55 गॅस सिलेंडरचा साठा जमा करून शहरातील हॉस्पिटलमध्ये पुरवठा करण्यात आला हा पुरवठा झाला नसता तर नगर शहरामध्ये नाशिक सारखी भयानक परिस्थिती शहरांमध्ये उद्भवली असतील हा पुरवठा केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहे व हॉस्पिटलमध्ये जीवित हानी ऑक्सिजन विना झाली नाही व एमआयडीसी येथील ऑक्सीजन प्लांटवर थांबून तेथे बंदोबस्त लावण्यात आले व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करून देण्यात आले त्यामुळे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे समवेत नगर तालुका अध्यक्ष अमोल शिंदे आदी उपस्थित होते.