सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने आयुक्त यांना निवेदन!

ॲम्युनिटी प्लॉट मध्ये झालेले अतिक्रमण काढून लहान मुलांसाठी बगीचा व महापुरुषांचे पुतळे बसवण्याची मागणी 

अहिल्यानगर : मौजे नागापूर रेणुका नगर येथील गट नंबर १३/२ब /२क/३अ/३क ही जागा अम्युनिटी असून महानगरपालिकेच्या मालकीची असून त्यामध्ये खाजगी व्यक्तींकडून अतिक्रमण झालेले आहे. ते काढून सदरील अम्युनिटी प्लॉटचे सुशोभीकरण करून तेथे लहान मुलांसाठी बगीचा करून महापुरुषांचे पुतळे बसवण्यात यावे या मागणीसाठी मनपा आयुक्त डांगे यांना सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे समवेत साहेबराव काते, कर्मा वावरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे नियोजनात म्हटले आहे की, मौजे नागापूर येथील रेणुका नगर येथे गट नंबर १३/२ब/२क/३अ/३क ॲम्युनिटी ही जागा महापालिकेच्या मालकीची अम्युनिटी आहे सदरील अम्युनिटी प्लॉट काकासाहेब म्हस्के कॉलेज रोड आंबेडकर चौक सन फार्मा शाळा जवळ आहे तरी सदर अमेनिटीमध्ये खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण करून गाळे काढलेले आहे त्यामध्ये तो खात आहे. त्यामुळे पालिकेने जागा खाली करून तिथे शाळेतील व परिसरातील लहान मुलांसाठी व नागरिकांसाठी बगीचा तयार करण्यात यावा व थोर महापुरुषांचे पुतळे साहित्यरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे बसविण्यात यावे अन्यथा महापालिकेवर गाढवाचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे  निवेदनात म्हटले आहे.