शिर्डीची लेक प्रियंका पगार MPSC पास, महसूल सहायकपदी निवड – नव्या पिढीची प्रेरणा!

मेहनत आणि जिद्द यांचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रियंका पगार!

शिर्डीची लेक प्रियंका पगार MPSC पास, महसूल सहायकपदी निवड – नव्या पिढीची प्रेरणा!

 

| मेहनत आणि जिद्द यांचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रियंका पगार! शिर्डीच्या प्रियांका पंढरीनाथ पगार हिने MPSC परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत महसूल सहायकपदी आपली जागा मिळवली आहे. एका सर्वसामान्य घरातून आलेली प्रियंका आता अनेक तरुणींसाठी रोल मॉडेल बनली आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी तिचा सत्कार करताना म्हटलं, “प्रियंकाने अपार मेहनतीतून मिळवलेलं हे यश भावी विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.”

 

या गौरवाच्या क्षणी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी नगरसेवक गोपीनाथ गोंदकर, पत्रकार वाल्मिक बावचे यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिचा सत्कार केला.

 

प्रियंकाचं शिक्षण शिर्डीतील साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल आणि साईबाबा ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडलं. त्यानंतर तिने संभाजीनगरच्या पाटील कृषी महाविद्यालयातून B.Sc. Agri पदवी मिळवली आणि नाशिकच्या पृथ्वी अकॅडमीतून स्पर्धा परीक्षा तयारी केली.

 

घरात कोणीही उच्चशिक्षित नसताना आणि कुठलाही ‘गॉडफादर’ नसताना, फक्त चिकाटी, अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रियंकाने हे स्वप्न सत्यात उतरवलं. तिचं यश आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, “शिर्डीची शान” म्हणून तिचं कौतुक होत आहे!

#ShirdiPride #MPPSCSuccess #GirlPower #Inspiration #ProudMoment #MetroBuzz