शिव राष्ट्र सेनेच्या वतीने आगळीवेगळी शिवजयंती साजरी

डीजे मिरवणुकीला फाटा देत आरोग्य शिबीराचे आयोजन

अहमदनगर  : शिव राष्ट्र सेनेच्या वतीने यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त  सारसनगर इथे शिव राष्ट्र सेनेच्या वतीने आरोग्य शिबीर आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी जुन्या बस स्थानक चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  अश्वारूढ पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. डीजे, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्याच्या प्रथेला फाटा देऊन पक्षाच्या वतीने आरोग्य शिबीर घेऊन ही शिवजयंती साजरी करण्यात आल्याचे रत्ना नवसूपे यांच्या  वतीने सांगण्यात आले.

Also see this and subscirbe

 

आमदार खासदारांना  आमंत्रण न देता मारुती जयभाय या , दिव्यांग वृद्ध व्यक्तीच्या हातून वृक्षारोपण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी  शिव राष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसूपे यांनी मार्गदर्शन केले.  इतर खर्चांना फाटा देऊन सामाजिक उपक्रम केला असल्याचे बाबासाहेब करपे यांनी  सांगितले. यावेळी शंभू नवसूपे यांनी शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार जाधव यांनी केले. यावेळी विजय जगताप , बाळासाहेब टाक, अनिकेत पवार, माया सूर्यवंशी, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.