कंत्राटी कर्मचाऱ्यांना झटका!
"आर्थिक कारणामुळे कायम करू शकत नाही" – मंत्री सामंत यांचे विधान


मुंबई | प्रतिनिधी
अहिल्यानगर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न चुरगाळले! गेली १० वर्षे पाणीपुरवठा, वीज, वाहन चालवणे यासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मानधनावर काम करणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांना आता कायम नोकरीची आशा धूसर झाली आहे.
विधानपरिषदेत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उचलून धरला.
तर काँग्रेस आमदार सत्यजित तांबे यांनी “सर्व महापालिकांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी जोरदार मागणी केली.
मात्र मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट सांगितले –
“अहिल्यानगर महापालिकेचा आस्थापना खर्च आधीच ३५% च्या मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ६१.८९% आहे.
सध्या दरवर्षी ७८.४३ कोटी रुपये केवळ वेतनावर खर्च होतो.
त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे सध्या शक्य नाही.”
अजून काय म्हणाले मंत्री सामंत?
- हे कर्मचारी तांत्रिक सेवेत ६ महिन्यांच्या करारावर आहेत
- नेमणुकीत कुठेही ‘कायम नोकरी’चं आश्वासन नव्हतं
- किमान वेतन कायद्यानुसारच त्यांना पगार दिला जातो
- 7वा वेतन आयोग आणि महागाई भत्त्यामुळे खर्च प्रचंड वाढला
- नवीन भरतीसाठी शासनाच्या अटी पूर्ण केल्यावरच पुढचा निर्णय होईल
काम करतो आम्ही… आणि स्थिरता मात्र नाही!
अहिल्यानगर महापालिकेतील अनेक कर्मचारी गेली 10-12 वर्षे दिवसरात्र मेहनत करत आहेत.
त्यांचं एकच म्हणणं आहे — “कायम करा किंवा वेतन वाढवा!”
पण आता सरकारकडून मिळालेला हा नकार… त्यांचं भविष्य अधिकच अंधारात टाकणारा ठरतोय.
MetroNews.co.in साठी विशेष रिपोर्ट
#AhilyanagarUpdates #ContractEmployees #UdaySamant #JobSecurity #MunicipalCorporationNews #MetroNewsExclusive #PoliticalBuzz #ChitraWagh #SatyajeetTambe #MaharashtraPolitics
अजून काय म्हणाले मंत्री सामंत?
काम करतो आम्ही… आणि स्थिरता मात्र नाही!