🔥स्वडाजंगी! नाना vs शिंदे : “हा सत्तेचा माज – प्रसिद्धीचा स्टंट!”
💥 नाना पटोले वि. एकनाथ शिंदे – राजकारणात थेट भिडंत!
भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापलंय. यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला!
📣 पटोले म्हणाले –
“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी खासदारकीचा राजीनामा भाजपच्या तोंडावर फेकला होता. एक दिवसाचं निलंबन म्हणजे काहीच नाही!”
“सत्तेवर येताना दिली आश्वासनं – कर्जमाफी, हमीभाव, २४ तास वीज – आता मात्र शेतकऱ्यांचा अपमान सुरू. हा सत्तेचा माज आहे!”
“लोणीकर, कोकाटे, फडणवीस सारखे नेते शेतकऱ्यांविरोधी बोलतात. यांना माफी मागावीच लागेल!”
🗣️ शिंदेंचं प्रत्युत्तरही जोरदार –
“मोदींना एकेरी हाक देणं हा निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट आहे! पटोलेंना दिल्लीच्या काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही, म्हणून त्यांनी ही ड्रामा केला!”
“पटोले यांना चर्चेत राहण्यासाठी ‘मोदी’ नाव घ्यावं लागतं, हे दुर्दैव आहे! कारण… बाप-बाप असतो!”
📌 राजकीय रणधुमाळी आता सोशल मीडियावरही जोरात सुरु आहे!
➡️ शेतकऱ्यांच्या पाठीमागे कोण?
➡️ ‘सत्तेचा माज’ की ‘लोकप्रियतेचा स्टंट’?
➡️ याचं उत्तर जनतेकडेच!
#नानाVsशिंदे #शेतकरीआंदोलन #राजकीयगोंधळ #ModiControversy #BJPvsCongress #PoliticalDrama