धक्का दायक!

महिला सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न “अटक झाली नाही तर आंदोलन पेटणार!” – समाजबांधवांचा इशारा

🚨
धक्का दायक!

👉 महिला सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न 😡
👉 “अटक झाली नाही तर आंदोलन पेटणार!” – समाजबांधवांचा इशारा 🔥

📍 श्रीगोंदा | पोलीस न्यूज नेटवर्क

श्रीगोंदा तालुका हादरवणारी घटना! दलित समाजातील विद्यमान सरपंच मीनाक्षी सकट यांना काही गावगुंडांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 😱 त्यांच्या गाडीला पेट लावण्यात आला, त्या स्वतः गंभीर जखमी झाल्या असून मुलगाही जखमी आहे.

ही घटना समजताच ससाणेनगर आणि सिद्धार्थनगर समाजबांधवांनी एकमुखाने निषेध नोंदवला. 👉 “२४ तास उलटून गेले, आरोपी अजूनही मोकाट! तात्काळ अटक झाली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार!” असा वज्र इशारा पोलिसांना देण्यात आला.

❓ काय आहे प्रकरण?

  • मीनाक्षी सकट गेल्या ४ वर्षांत गाव विकास, महिला हक्क आणि दलित समाजासाठी झटल्या.
  • त्यामुळे जातीयवादी मंडळींनी त्यांना सतत त्रास दिला.
  • १७ ऑगस्ट रोजी परत येताना पेट्रोल ओतून हल्ला!
  • गाडी जळून खाक 🚗🔥, सरपंच आणि त्यांचा मुलगा जखमी.

📢 संतप्त आवाज

बहुजन समाज, आरपीआय, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येत म्हणाले:
👉 “हा खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का?”
👉 “दलित महिला सरपंचीला जाळण्याचा प्रयत्न, ही लाजिरवाणी वेळ प्रशासनाने ओढवून घेतली आहे.”

⚡ पोलिसांना निवेदन

 

पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे आणि निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देऊन तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.