“Badnaam करू का? 10 लाख दे!” – YouTuberची खंडणी मागणी; पोलिसांत थेट गुन्हा दाखल!

“तुमची संस्था बदनाम करतो… व्हिडिओ टाकतो!”

🚨
“Badnaam करू का? 10 लाख दे!” – YouTuberची खंडणी मागणी; पोलिसांत थेट गुन्हा दाखल!

📍 संगमनेर | मेट्रो न्यूज ब्रेकिंग

“तुमची संस्था बदनाम करतो… व्हिडिओ टाकतो!”
अशी धमकी देत १० लाखांची खंडणी मागणाऱ्या एका YouTube चॅनेल चालकाविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं गेलं आहे.

🔍 काय घडलं नेमकं?
संगमनेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून एक प्रतिष्ठित सेवाभावी संस्था काम करत आहे.
मात्र अकोलेमधील एका युट्युबरने या संस्थेची बदनामी करणारे व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत पैसे मागायला सुरुवात केली.

🤑 सुरुवात 10 लाखांपासून… सौदा 6 लाखांत ठरला!

  • 4 ऑगस्ट: मागणी 10 लाखांची
  • सौदा ठरला 6 लाखात – 3 लाख तात्काळ, उर्वरित नंतर
  • मंगळवारी पुन्हा फोन – “4 लाख घेऊन ये!”

🛑 धमकीला कंटाळून संस्थाचालकांनी थेट तक्रार दाखल केली!
याबाबत पोलिसांनी ‘साळवे’ (पूर्ण नाव अद्याप अस्पष्ट) या युट्युबरवर गुन्हा दाखल केला आहे.
त्याने धांदरफळ फाटा आणि अकोले बस स्टँडजवळ संस्थेच्या प्रतिनिधींना पैसे देण्यासाठी बोलावल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

👮‍♂️ पोलीस तपास सुरू असून याप्रकरणाचा अधिक शोध घेतला जात आहे.


 

🛑 “ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना सोशल मीडियावर नाही, तर जेलमध्ये जागा!”