सेवानिवृत्तीनंतरही सैनिक करतायेत देशसेवा

जयहिंद चे कार्य देखील वटवृक्षसारखे आहे : गणेश हडदगुणे

जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर च्या माध्यमातुन औद्योगिक शिक्षण केंद्र अहमदनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती श्रीमती सुवर्णाताई माने मॅडम (आय एफ ओ) अहमदनगर उपवनसंरक्षक सुनिल थेटे, आर एफ ओ गावडे , कोल्हारचे सरपंच शिवाजीराव पालवे, विष्णु गिते पाटील , आजिनाथ पालवे, बाळासाहेब पालवे, सैनिक बचत गट च्या अनिताताई नेटके, नवनाथ पालवे, जय हिंद चे शिवाजी पालवे, वृक्षबँक चे संचालक शिवाजी गर्जे , आत्माराम दहातोंडे, शिवाजी पठाडे, आय टी आय चे प्राचार्य सुनिल शिंदे, गणेश हडदगुणे, जालिंदर खाकाळ, रविंद्र पवार , अरूण गोंधळे, गजानन स्वामी, उत्तम ठोकळ, मंदा सुपेकर, सतिष भुसारी, भाऊसाहेब थोरात , संजय पांढारकर , प्रशांत आढे, महेंद्र गलांडे , धनंजय घोंगडे, भागिनाथ पगारे, वैशाली कुरापाटी, सातपुते मॅडम ,क्षेत्रे सर , कांबळे सर, उपस्थीत होते.

 

 

यावेळी सुवर्णा माने म्हाणाल्या , जय हिंद फौंडेशन म्हणजे आजिमाजी सैनिकांची मोठी चळवळ आहे . नगर जिल्हात 625वृक्षापासुन बनवलेले जागतिक पंचवृक्ष , 500 वडाची झाडे लावलेले गर्भगिरी वडराई , संपुर्ण गावातील दिवंगत व्यक्ती च्या नावे 1000 फळ झाडे लावलेले डोंगरी स्मृती उद्यान, असे ऐतिहासिक वृक्षारोपण करुन संवर्धन सैनिक करत आहेत. येण्यार्या काळात जय हिंद फौंडेशन च्या कामगिरी ची इतिहासात नोंद होईल.

 

हे ही बघा आणि सबस्क्राईब करा.

 

 

सेवानिवृती नंतर देखील सैनिक समाजसेवा करत आहेत. अनेक समाजउपयोगी उपक्रम जिल्हात राबवले जात आहेत. सैनिकांची देशभक्ती कौतुकास्पद आहे. आय टी आय चे गणेश हडदगुणे सर यांनी जय हिंद चे आभार मानत 25 वडाची झाडे लागवड चे स्वागत करून संवर्धनाची जबाबदारी घेतली. जसे , वड हे राष्ट्रीय वृक्ष आहे जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष असुन सदैव हरीत व स्वच्छ सावली देणारे आहे, तसेच जय हिंद चे कार्य देखील वटवृक्षा प्रमाणे आहे.

 

 

सैनिकांच्या कार्याला मी सलाम करतो.यावेळी सरपंच शिवाजी पालवे , प्राचार्य सुनिल शिंदे, आर एफ ओ सुनिल थेटे, यांनी फौंडेशन चे कौतुक केले. आभार मेजर आत्माराम दहातोंडे यांनी मानले