घनकचरा विभागाच्‍या बैठकीत उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे यांचे आदेश

स्‍वच्‍छ सुंदर शहरासाठी 100 टक्‍के कच-याचे संकलन करा.

नगर –  एक लाख वीस हजार घरापर्यत घंटागाडी जावून 100 टक्‍के कच-याचे संकलन होणे गरजेचे आहे. घनकचरा विभागाच्‍या बैठकीत उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे यांचे आदेश,  त्‍याच बरोबर 100 टक्‍के सुका व ओला कचरा विलगीकरण करून  त्‍यावर 100 टक्‍के प्रक्रिया झाली पाहिजे. तेव्‍हाच  ख-या अर्थाने आपले शहर स्‍वच्‍छ व सुंदर राहिल यासाठी सर्व घनकचरा विभागाच्‍या व आरोग्‍य विभागाने कामाचे नियोजन करावे. शहरातील 3 रॅम्‍प वरून घंटागाडीतील कचरा कॉम्‍पॅक्‍टर द्वारे कचरा डेपोवर वेळेचे नियोजन करून पाठविण्‍यात यावे. आपण ठेकेदारा मार्फत उचलल्‍या जाणा-या कच-यासाठी कोटयावधी रूपये देतो. त्‍याच्‍याकडून काम करून घेणे गरजेचे आहे. यासाठी नियोजन करा. आपण भारत स्‍वच्‍छ अभियाना करिता काम न करता वर्षभर काम करावे अशी माहिती घनकचरा विभागाच्‍या बैठकीत उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे यांनी दिली.

Also  see this and subscribe

 

कुठेही रस्‍त्‍यावर कच-याचे ढिग दिसणार नाही याची काळजी घ्‍या. मी सकाळी 7 वाजल्‍यापासून शहरात फिरत असतो. मला सर्व माहिती झाली आहे.  घनकचरा विभागाच्‍या गाडयांना जीपीएस बसविले आहेत का याची माहिती घ्‍या. त्‍याच बरोबर घंटागाडीवरील गाणे चालू ठेवा. नागरिकांसाठी हेल्‍पलाईन उपलब्‍ध करून देणे गरजेचे आहे. तीच गाडी, ड्रायव्‍हर, हेल्‍पर  त्‍याच प्रभागामध्‍ये दररोज गेली पाहिजे. गाडयांबरोबर मनपाचे कर्मचारी पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करावी. ओला व सुका कचरा वेगळा करणे गरजेचे आहे. यासाठी ठेकेदार यांनी घंडागाडीला दोन कप्‍पे करण्‍यात यावे व नागरिकांना याची माहिती दयावी. नागरिकांमध्‍ये मनपा बद्दलची भावना सकारात्‍मक होईल यादृष्टिने काम करा. आपण शहरामध्‍ये काम करतो असे दिसले पाहिजे. त्‍यानंतरच नागरिक यामध्‍ये सहभागी होतात.

स्‍वच्‍छता अपवर तक्रार आल्‍यानंतर ताबडतोब ती सोडविण्‍यासाठी कर्मचारी यांनी घटनास्‍थळी प्रत्‍यक्ष जावून तक्रारीचे निराकरण करावे. शहरातील 17 प्रभागामधील 1 रस्‍ता निवडा व त्‍याचे सुशोभिकरण करावे यावर पेंटीग झाडे स्‍वच्‍छता ठेवावी. जेणे करून टप्‍प्‍या टप्‍प्‍याने संपूर्ण शहर स्‍वच्‍छ व सुंदर दिसेल. 60 घंटागाडया 15 टॅकर व 3 कॅम्‍पॅक्‍टर द्वारे पूर्ण क्षमतेने कचरा उचलला गेला पाहिजे. दर सोमवारी दुपारी 4 वा. बैठक घेतली जाईल. त्‍यामध्‍ये शहरातील कच-या संदर्भात आढावा घेवून नियोजन करण्‍यात येईल अशी माहिती उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे यांनी दिली.

यावेळी स्‍वच्‍छता निरिक्षक, केअरटेकर, मुकादम व कचरा संकलन एजन्‍सीचे कर्मचारी उपस्थित होते. सर्वांकडून माहिती घेवून सुचना देण्‍यात आल्‍या.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.