सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ व निवृत्तीवेतन प्रस्ताव मंजूरी देण्याची मागणी—अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सचिव संतोष कानडे

सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ व निवृत्तीवेतन प्रस्ताव मंजूरी देण्याची मागणी—अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सचिव संतोष कानडे यांनी माहिती दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @पुणे या उपक्रमांतर्गत मा.ना. उदयजी सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी संस्था प्रतिनिधी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्याशी पुणे विद्यापीठात संवाद साधला.उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, कुलगुरू डॉ.नितिन करमळकर, कुलसचिव डॉ.प्रफ्फुल पवार.यांच्यासह पुणे विभागीय सहसहसंचालक डॉ. मोहन खताळ,प्रशासनअधिकारी अर्चना बो-हाडे,संबंधित   अधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठीचे निवेदन शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांना देण्यात आले . सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव त्वरित मंजुरी.आश्वासितप्रगती योजना पुर्वलक्षी लागु करुन सातवा वेतन आयोग लाभ मिळावा.मेडिकल बीलाना मंजुरी,कॅशलेस मेडिकल सुविधा,अनुकंपा भरती, शिक्षकेतर पदभरती सुरू करावी, वेतन त्रुटी प्रस्ताव त्वरित मंजुरी,अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी  विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, अंकुश आनंद,अनिल माळवदे, दिपक अल्हाट, डॅनियल पाटोळे, उपस्थित होते.