ऊसतोड कामगाराचा मुलगा बनला ‘सिंघम’ – संतोष खाडेंचा अफलातून प्रवास सध्या सोशल मीडियावर व्हायरल!
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाटचा सुपुत्र आणि ऊसतोडणी कामगाराच्या घरात जन्मलेला संतोष आजिनाथ खाडे याने आपल्या जिद्दीतून अशक्य वाटणारे शक्य करून दाखवले आहे. आई-वडीलांनी ऊसतोड करून शिकवलेला हा मुलगा थेट MPSC मध्ये 16 वा क्रमांक पटकावत पोलीस उपअधीक्षक झाला!

पहिल्या प्रयत्नात अपयश, पण हार न मानता संतोषने दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवत संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप सोडली. सर्वसाधारण गटातून १६ वा क्रमांक आणि NT प्रवर्गातून राज्यात पहिला!
अहिल्यानगरमध्ये चार महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान ‘खाडे सरांनी’ जे कामगिरीचे पर्व लिहिले ते थेट सिनेमाला शोभेल असंच! गुटखा, मावा, जुगार अड्डे, दारू अड्डे, अवैध गोरक्षण कत्तलखाने – सर्वांवर कारवाईचा धडाकाच!
प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या छाप्यांची चर्चा. सोशल मीडियावर त्यांना “अहिल्यानगरचा सिंघम” अशी टॅगलाईन मिळाली.
त्यांचा बालपणातला संघर्ष थक्क करणारा – शेतात काम, कष्ट आणि अभ्यास एकाचवेळी. आई-वडिलांच्या स्वप्नाला बळ देत त्यांनी दाखवून दिलं, “जिथे जिद्द असते तिथेच यश असतं!”
प्रशिक्षणाची अखेर १९ जुलै रोजी झाली. पोलीस विभागाने त्यांचा गौरवपूर्वक निरोप घेतला. आता उरलेल्या दोन महिन्यांचं प्रशिक्षण इतर जिल्ह्यात होणार असून, त्यानंतर मिळेल पहिली पोस्टिंग – ज्यावर सगळ्यांचं लक्ष!
संतोष खाडेंची ही यशोगाथा फक्त सावरगाव घाट नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. उगम ठिकाण ऊसतोड, स्वप्न मात्र मोठं – आता तो अधिकारी!