अंगण स्वच्छ ठेवणार, त्याचा २६ ला सत्कार !

अहिल्यानगर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान १ ते २० जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेचे उच्चतम मानक राखत ग्रामीणं भाग स्वच्छ व सुंदर बनवणे, वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर आणि दैनंदिन स्वच्छतेचे पालन, घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझरखड्यांचा वापर करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. या अभियानात स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या कुटुंबांचा २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत प्रशस्तीपत्र, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल.

१ ते २० जानेवारीदरम्यान अभियान

‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान १ ते २० जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे, ग्रामीण भागात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करून इतरांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभागी व्हावे. घरातील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व शौचालयांच्या स्वच्छतेबाबत नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.