सुपर मार्केट , किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री चा निर्णयाबाबत जनतेकडून हरकती मागविणार , किराणा दुकानात वाइन विक्री होणार नाही असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले ,
राज्य सरकारने वाईन विक्री संदर्भात घेतलेला निर्णय अतिशय दुर्देवी असुन तात्काळ निर्णय मागे न घेतल्यास दि. १४ फेब्रुवारी पासुन राळेगण येथे आमरण उपोषणाचा इशारा समाजसेवक आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.