नगर अर्बन बँकेसह खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुमारे २८ प्रकरणांत १०० ते १५० कोटी रूपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत कृती समितीचे राजेंद्र गांधी आणि बँकेचे संस्थापक चेअरमन स्व. सुवालाल जी गुंदेचा प्रणित पॅनेलच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात बँकेच्या आजी माजी संचालकांचा…