अर्बन बँक निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरूच

बँक बचाव कृती समितीने फुंकले बिगुल

अहमदनगर

(संस्कृती रासने)   प्रतिनिधी:

 

नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक  निवडणुकीत  कृती समितीचे राजेंद्र गांधी आणि बँकेचे संस्थापक चेअरमन स्व. सुवालाल जी गुंदेचा प्रणित पॅनेलच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात बँकेच्या आजी माजी संचालकांचा समावेश  आहे. या अगोदर बँकेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रपंच या इच्छुक उमेदवारांनी मांडला होता. त्याच्या वाटाघाटी देखील सुरु आहेत. त्याला यश येऊपर्यंत खबरदारी चा उपाय म्हणून या पॅनल ने आपले उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवल्याचे समजते.

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

येत्या २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने मोठ्या तयारीने उडी घेतली आहे. समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी आणि स्व. सुववलालजी गुंदेचा प्रणित हे पॅनल आहे. नगरचे ग्राम दैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात महा आरती करून या समितीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राजेंद्र गांधी आणि अन्य उमेदवारांच्या हस्ते ही महाआरती झाली. यात अहमदनगर महानगर पालिका आणि भिंगार कॅन्टोन्मेंट गटातून राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा , मेहुल भंडारी , सी ए ज्ञानेश्वर काळे, मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रकाश कराळे, माजी नगरसेवक  सुरेश तिवारी, ऍड. अच्चूत पिगळे ,  सौ गीता गिल्डा, श्रीरामपूर  शाखा मतदार संघातून   माजी संचालक संजय छ ल्लारे,  आष्टीतुन ईश्वर भंडारी, सोनाई इथून संजय भलगट , अनुसूचित जाती  गटातून बँकेचे  माजी व्हॉइस चेअरमन माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.  ही बँक वाचविण्यासाठी आपला प्रयत्न आहे.

 

 

 

ही बँक म्हणजे नगरचे आर्थिक वैभव आहे. आपण बँकेचे संस्थापक चेअरमन स्व. सुवालालजी गुंदेचा यांना मानणारे सर्वजण आहोत. सुवालालजी १५ वर्षे चेअरमन होते त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या प्रतिष्ठेला तडा जाईल अशी कोणतीही गोष्ट घडली नाही त्यामुळे बँकेत संचालक म्हणून निवडून गेल्यानंतर आपण चुकीचे काम करणार नाही . बँकेच्या हितासाठी आपण बँक बिनविरोध करण्याचाच प्रयत्न करू असा निश्चय राजेंद्र गांधी यांनी केला. यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांचे भाषण झाले.  यावेळी नगर शहर सहकारी बँकेचे माजी चेअरमन सुरेश चव्हाण, अशोक कानडे, सदा देवगावकर, अशोक कोठारी, बँकेचे माजी संचालक ऍड अभय आगरकर , शिवसेनेचे माजी शहर प्रमुख  संभाजी कदम आणि अर्बन बँक बचाव कृती समितीचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.