अहिल्यानगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या मागण्यासाठी वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांना निवेदन-सुनील गाडगे
अहिल्यानगर : जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहेत . शिक्षकांचे विविध समस्या समजून घेऊन आता लवकरात लवकर ही समस्या सोडविण्यात यावे, या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांना जिल्हयातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी सांगितले.
या निवेदनात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी पात्र शिक्षकांचे वेतन श्रेणी प्रस्ताव तातडीने मंजुर व्हावेत, टप्पा अनुदानावरील शाळांना अनुदान मंजुर करावे, प्रलंबित थकीत देयके व वैदयकिय देयके त्वरीत मंजुर करावीत, डि.एड ते बी. एड व ये एम ते बी. एड प्रमोशन प्राप्त शिक्षकांना प्रमोशन मिळावे, माध्यमिक शिक्षकांवर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्यात यावा, विनाअनुदानित शाळेतुन अनुदानित शाळेत बदलीस मान्यता दयावी, जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा, अतिरिक्त ठरलेल्या पदांचे समायोजन करावे, वेतनेतर अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा, प्रोव्हिडंड फंडांच्या पावत्या कर्मचा-यांना मिळाव्यात.
असे शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा सचिव विजय कराळे, कार्यवाह संजय भुसारी, शेवगाव तालुका अध्यक्ष कैलास जाधव, जिल्हा समन्वयक योगेश हराळे, नगर तालुका अध्यक्ष नवनाथ घोरपडे, श्रीगोंदा प्रमुख सचिन शेलार, सरचिटणीस नगर तालुका गोरक्षनाथ गव्हाणे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष रामराव काळे पुणे विभागीय कार्याध्यक्ष तथा शिक्षक भरतीचे जिल्हा सचिव महेश पाडेकर संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, सोमनाथ बोंतले, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर, विनाअनुदानित च्या राज्यअध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी मागणी केली आहे.